प्रभाग ३ किरण भाऊ बहारे जोरदार साध्या कुटुंबातील जनतेचा माणूस म्हणून मिळतोय उत्स्फूर्त पाठिंबा
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ३ मधून कृष्ण रामसिंग बेहेरे उर्फ किरण भाऊ बेहेरे यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करताच प्रभागात चर्चा, उत्साह आणि नव्या बदलाची हवा निर्माण झाली आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून किरण भाऊ यांना सर्व समाजघटकांतून मिळणारा जबरदस्त प्रतिसाद त्यांच्या लोकप्रियतेची ठोस साक्ष देणारा आहे. साधं, जमिनीवरचं राहणीमान आणि प्रत्येकाच्या अडचणीत उपस्थित राहणारी कार्यशैली यामुळे त्यांच्याबद्दल जनतेत प्रचंड आत्मीयता निर्माण झाली आहे. प्रभागातील जनता आता पूर्वीपेक्षा अधिक सजग आणि जागरूक झाली आहे.

केवळ निवडणुकीच्या काळातच दिसणारे नेते, गाडीत बसून कानाला फोन लावणारे, खिडकीची काच खाली न करणारे अशा दुरावलेल्या नेत्यांना जनता आता धडा शिकवण्याच्या मनःस्थितीत आहे. “सामान्य घरातील, सर्वांच्या सुखदुःखात धावणाऱ्या माणसाला संधी द्यायचीच!” असा दृढ निर्धार प्रभाग 3 मध्ये उमटताना दिसतोय.
जनता विकासासाठी खऱ्या अर्थाने उपलब्ध राहणाऱ्या व्यक्तीलाच निवडणार, असे मतदारा बोलताय. किरण भाऊंच्या प्रचारादरम्यान लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, विश्वास आणि आशीर्वादाचा ओलावा दिसतो. “भाऊ, तुम्ही जिंकणारच… आता प्रभागाची जबाबदारी तुमच्यावरच!” असे शब्द अनेक कार्यकर्ते आणि नागरिक भावनिकतेने व्यक्त करत आहेत. बदलाची शाश्वती जनतेनेच दिल्याने २०२५ च्या या निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये किरण भाऊ बेहेरे हे अत्यंत भक्कम, लोकाभिमुख आणि जनहितासाठी तत्पर उमेदवार म्हणून पुढे येताना दिसत आहेत.