न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग ०७-ब मध्ये अविनाश दगडू जाधव (अवि डी.जे) यांची उमेदवारी ठरतेय प्रभागासाठी परिवर्तनाची नवी दिशा

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग ०७-ब मध्ये अविनाश दगडू जाधव (अवि डी.जे) यांची उमेदवारी ठरतेय प्रभागासाठी परिवर्तनाची नवी दिशा..

 

जनतेचा दिलखुलास पाठिंबा  “आपला हक्काचा माणूस हवाच!”

 

अमळनेर : विक्की जाधव.

नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ०७-ब (सर्वसाधारण पुरुष) मधून अविनाश दगडू जाधव यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर करताच प्रभागात उत्साह, उर्जा आणि नवचैतन्याची लाट उसळली आहे. वर्षानुवर्षे प्रभागातील प्रत्येक सुख-दुःखात निस्वार्थपणे उपस्थित राहणारा, छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी धडपड करणारा आणि सर्व समाजाला समान दृष्टीने जोडणारा “आपला हक्काचा माणूस” म्हणून अवी जाधव यांची ओळख प्रभागात निर्माण झाली आहे.

प्रचारादरम्यान प्रभागातील सर्व समाजघटकांतून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अवी जाधव यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, नागरिकांना मूलभूत सुविधा, ज्येष्ठांचे प्रश्न आणि तरुणांच्या अपेक्षा या सर्व विषयांवर ठोस योजना आणि कामकाजाची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. “विकास म्हणजे बोलणे नव्हे, प्रत्यक्ष काम!” या त्यांच्या भूमिकेमुळे प्रभागातील मतदारांचा त्यांच्यावर वाढता विश्वास अधिक दृढ होत आहे.घराघरातील भेटीमध्ये महिलांचा दिलखुलास प्रतिसाद, तरुणांचा मिळणारा पाठिंबा आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद यांच्या जोरावर अवी जाधव यांचा प्रचार दिवसेंदिवस जोमात वाढताना दिसत आहे. “आता प्रभागाला काम करणारा नेता हवा… अवी डी.जे.च हवा!” असा एकसूर प्रभागभर उमटत आहे. अमळनेर नगरपरिषदेत प्रभाग ०७-ब च्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम, पारदर्शक आणि जनतेच्या सोयीसाठी नेहमी उपलब्ध राहणारे नेतृत्व म्हणून अविनाश जाधव भक्कम उमेदवार ठरत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!