न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग १८-ब मध्ये शशिकलाताई महाजन यांची लाट सहानुभूती, विश्वास आणि आशीर्वादातून घडतोय विजयाचा मजबूत पाया

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग १८-ब मध्ये शशिकलाताई महाजन यांची लाट सहानुभूती, विश्वास आणि आशीर्वादातून घडतोय विजयाचा मजबूत पाया

 

अमळनेर : विक्की जाधव.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक १८-ब मधून नगरसेविका पदासाठी मैदानात उतरलेल्या शशिकलाताई महाजन यांच्या प्रचाराची जोरदार चर्चा प्रभागभर रंगत आहे. घराघरात होत असलेल्या भेटीदरम्यान त्यांना मिळणारा सहानुभूतीचा ओलावा, विश्वासाचा मजबूत आधार आणि मोठ्यांपासून लहानांपर्यंत मिळणारे आशीर्वाद यांनी त्यांच्या उमेदवारीला एक नवी ऊर्जा मिळाली आहे. प्रभागातील महिला, तरुण माता, ज्येष्ठ नागरिक यांनी दाखवलेला उत्स्फूर्त पाठिंबा ताईंच्या प्रचाराची दिशा आणि वेग दोन्ही बदलून टाकत आहे.

आजच्या काळात महिला सक्षमीकरणाचे खरे प्रतीक म्हणून शशिकलाताई महाजन यांच्याकडे प्रभाग आशेने पाहत आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास, प्रत्येक घटकाचा सहभाग आणि महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य या तीनही गोष्टीं ताईंच्या कार्यशैलीत दिसत आहे. म्हणूनच जनतेच्या अपेक्षा त्यांच्या दिशेने भराभर वळत आहेत. “ताई, आता आमचा प्रभाग तुमच्यावर सोपवला आहे” असा विश्वास सर्वच समाजघटकांतून दृढ होत चालला आहे.

प्रचारादरम्यान रस्त्यात भेटणारे लहान मुले, त्यांना आशीर्वाद देणाऱ्या आजी-आजोबा, घरासमोर हात मिळवत उभे राहणारे युवक सर्व जण शाश्वती व्यक्त करत आहेत की ताई आता थांबायचं नाय… लढेंगे और जीतेंगे! समर्थकांच्या या उद्धघोषाने प्रभाग १८-ब मध्ये जिंकण्याची हवा अधिकच अनुकूल बनली आहे. त्यांच्याभोवती निर्माण झालेला विश्वासाचा हा कवच आगामी निवडणुकीत मोठी ताकद ठरणार आहे.

जनतेच्या मनातील उमेद, प्रभागाच्या विकासाची तळमळ आणि महिलांसाठी सुरक्षित व सशक्त वातावरण निर्माण करण्याचा ताईंचा निर्धार यामुळे या निवडणुकीत शशिकलाताई महाजन यांचे नाव प्रभाग १८-ब मधील सर्वात विद्यमान आणि चर्चेतले ठरले आहे. विश्वास, सेवा आणि विकासाच्या तिन्ही धाग्यांनी विणलेली ही उमेदवारी प्रभागाला नवी दिशा देणारी ठरेल, यात दुमत नाही.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!