न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे आरटीओ कडून पूरग्रस्त तांदुळवाडी गावाला मदतीचा हात..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

ठाणे आरटीओ कडून पूरग्रस्त तांदुळवाडी गावाला मदतीचा हात..!
प्रतिनिधी/आजिनाथ कनिचे( तांदुळवाडी)
माढा तालुक्यातील सीना नदीला महापूर आल्यामुळे अनेक घरे उध्वस्त झाली. अनेक गावात मदतीचा हात म्हणून अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. परंतु तांदुळवाडी गावातील विकास (बालाजी) परबत, कर्तव्यदक्ष आरटीओ अधिकारी ठाणे यांच्या सौजन्याने गावामध्ये महापुराच्या काळात पिण्याच्या पाण्याचे अडचण निर्माण झाल्यामुळे, त्यांच्या संकल्पाने व ठाणे आरटीओ अधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त गावापर्यंत मदतीचा हात पोहोचावा या संकल्पना करून सामाजिक भावनेतून त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना आवाहन केले. त्यांच्या एका संवेदनशील आव्हानाने कार्यालयातील अधिकारी उपाधिकारी व निरीक्षक आणि कर्मचारी यांच्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आर्थिक मदत गोळा केली. व तांदुळवाडी गावाला मोफत पिण्याचा पाण्याचा आरो प्लांट उभारून दिला.
आरटीओ अधिकारी विकास (बालाजी) परबत यांच्या हस्ते या प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तांदुळवाडी गावातील मा.सरपंच प्रमोद भोसले, बाळासाहेब कदम, बाळासाहेब ठोंबरे, महेश जाधव, मोहन परबत, शांतीलाल गवळी, नागनाथ जाधव, पप्पू गवळी, धनु गवळी, महेश परबत, नाना जाधव, अमोल उबाळे, सुधीर परबत, गुलाब जाधव, प्रतीक परबत, प्रमोद भोसले आदी ग्रामस्थ बांधव उपस्थित होते. यावेळी तांदुळवाडी गावातील ग्रामस्थांनी ठाणे आरटीओ व कर्मचाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!