न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग 3 मध्ये कृष्णा भाऊ बहारे यांच्या प्रचाराला वेग सर्व समाजाचा वाढता पाठिंबा; निवडणुकीत नवचैतन्य

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 3 मध्ये कृष्णा भाऊ बहारे यांच्या प्रचाराला वेग सर्व समाजाचा वाढता पाठिंबा; निवडणुकीत नवचैतन्य

 

अमळनेर : विक्की जाधव.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 3 मधील राजकीय वातावरणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. प्रभागातून उमेदवारी जाहीर केलेले किरण भाऊ उर्फ कृष्णा रामसिंग बहारे यांच्या प्रचाराला गत काही दिवसांत जबरदस्त वेग आला आहे. सामान्य नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, तसेच विविध समाजाचे अध्यक्ष यांच्याकडून कृष्णा भाऊंना मिळत असलेला व्यापक पाठिंबा प्रभागात चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रभागातील सर्व वयोगटातील नागरिक कृष्णा भाऊंच्या प्रचारात आणि प्रत्यक्ष भेट कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. त्यांच्या साधेपणाने, लोकांमध्ये मिसळून काम करण्याच्या वृत्तीने आणि अनेक वर्षांच्या सामाजिक सेवेमुळे त्यांना “आपला माणूस” म्हणून ओळख मिळाल्याचे नागरिक सांगत आहेत.

समाजाचा एकदिलाचा पाठिंबा

विविध समाजांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते कृष्णा भाऊंच्या उमेदवारीचे खुले समर्थन करत आहेत. “प्रभाग 3 मध्ये सर्व समाज एकत्र उभा आहे. कृष्णा भाऊंचे काम आणि स्वभावच त्यांच्या जमेची बाजू आहे. त्यांना निवडून द्यायलाच हवे” असा सुर सामाजिक माध्यमांवर जोरदार उमटताना दिसत आहे. कृष्णा भाऊ बहारे यांच्या उमेदवारीने प्रभागात खऱ्या अर्थाने नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक प्रश्नांवर त्यांनी केलेले प्रयत्न, गोरगरिबांसाठी दाखवलेली तत्परता आणि प्रभागाच्या विकासाबाबत असलेली स्पष्ट भूमिका यामुळे त्यांच्याबद्दल जनतेत सकारात्मक लाट पाहायला मिळते. “काम करणारा, संपर्कात राहणारा आणि कायम लोकांच्या पाठीशी उभा असणारा नेता हवा” अशी अपेक्षा व्यक्त करत अनेक नागरिकांनी कृष्णा भाऊंच्या प्रचारात स्वतःहून सहभागी होत आहेत.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!