फार्मर आयडी मिळण्यात विलंब शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन; प्रक्रिया सोपी करण्याची मागणी

अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) मिळण्यात होत असलेल्या अडचणींवर आज तहसील कार्यालयात अधिकृतरित्या आवाज उठवण्यात आला.शेतकरी ईश्वर उखा पाटील व शरद विनायक पाटील यांनी अमळनेर तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये, फार्मर आयडी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना महाडीबीटी, पोखरा व विविध कृषी योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर समस्या मांडण्यात आली.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे.
फार्मर आयडी मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे,तलाठी व तहसील कार्यालयांकडून माहिती मिळण्यात उशीर होत आहे,कागदपत्र पडताळणी आणि नोंदणी प्रक्रियेत स्पष्ट मार्गदर्शनाचा अभाव आहे.फार्मर आयडी जारी करण्याची प्रक्रिया सोप्या, जलद आणि पारदर्शक पद्धतीने राबवावीनिवेदन सादर करताना शेतकऱ्यांनी सांगितले की, “सरकारच्या योजना आहेत, परंतु आयडीच्या गुंतागुंतीमुळे आम्हीच लाभापासून दूर आहोत. प्रक्रिया सुलभ केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.”