अमळनेरचे मा. आमदार शिरीष चौधरी यांना पितृशोक आज पहाटे 3 वाजता दीर्घ आजाराने झाले दुःखद निधन
अमळनेरचे मा. आमदार शिरीषदादा चौधरी आणि हिरा उद्योग समूहाचे संचालक डॉ. रविंद्र बापू चौधरी यांचे आदरणीय पिताश्री, अखिल भारतीय तैलिक महासभेचे प्रांतीय उपाध्यक्ष काकासाहेब श्री. हिरालाल मगनलाल चौधरी (वय 86) यांचे आज पहाटे 3 वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
गोरगरीब जनतेचे कैवारी, समाजकार्याची परंपरा जपणारे, लोककल्याणाचा दीप प्रज्वलित ठेवणारे वंदनीय हिराकाका आज अनंतात विलीन झाले. समाजहितासाठी आयुष्यभर झटलेल्या या थोर व्यक्तिमत्वाच्या जाण्याने खान्देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक विचार, एक मार्गदर्शक आणि एक पितृतुल्य आधारस्तंभ हरपल्याची भावना जनमानसात आहे. त्यांचे कार्य, त्यांची निष्ठा आणि समाजासाठीचा त्यांच्या हृदयातील अढळ प्रेमभाव पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
अंत्ययात्रा : आज दि. 15/11/2025, शनिवार दुपारी 3 वाजता राहत्या घरून निघणार आहे. नंदुरबार.
शोकाकुल परिवार
श्री. रविंद्र बापू हिरालाल चौधरी श्री. शिरीषदादा हिरालाल चौधरी श्री. नरेंद्र हिरालाल चौधरीश्री. अशोक वसंतलाल चौधरी श्री. श्यामकुमार वसंतलाल चौधरी श्री. विजय वसंतलाल चौधरी आणि समस्त अहिरराव परिवार, नंदुरबार समस्त अमळनेर मित्र परिवार
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो… ॐ शांती.