प्रभागातील सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत श्रीमती शशिकला ताई महाजन उद्या करणार आपला नामांकन दखल..
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभागातील सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत श्रीमती शशिकला सुभाष महाजन या १५ नोव्हेंबर २०२५ उद्या. शनिवार सकाळी ११ वाजता आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
प्रभागातील माता-भगिनी, जेष्ठ नागरिक यांचा आशीर्वाद घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला आहे.
नामांकनासाठीची सुरुवात अमलेश्वर महादेवा चे दर्शन घेऊन परिसरातील समर्थकांसह नगरपरिषद कार्यालयाकडे भव्य रॅलीच्या स्वरूपात प्रस्थान होईल. प्रभागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावर असून, श्रीमती शशिकला महाजन यांच्या उमेदवारीला सर्व घटकांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.“सर्वांचा सहभाग सर्वांचा विकास” हा विचार पुढे नेत श्रीमती शशिकला महाजन यांनी केलेले आवाहन प्रभागातील जनतेमध्ये नवा उत्साह निर्माण करणारे ठरले आहे. प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्या निवडणूक प्रक्रियेची सुरुवात मोठ्याच्या आशिर्वादाने करत आहेत. सर्व नागरिकांना कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून नामांकनाचा कार्यक्रम प्रभागातील एकतेचे दर्शन घडवणारा ठरण्याची अपेक्षा आहे.