प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक पदासाठी कृष्णा रामसिंग बहारे (किरण भाऊ) यांचे नामांकन भरण्यासाठी असंख्य हितचिंतक समर्थक आणि मतदारांचा जमला मेळा.
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक पदासाठी कृष्णा रामसिंग बहारे (किरण भाऊ बहारे ) यांनी काल मोठ्या उत्साहात आपले नामांकन पत्र दाखल केले. नामांकन दाखल करताना ढोल-ताशांच्या गजरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभागातील मतदार, समर्थक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून किरण भाऊंप्रतीचा विश्वास आणि पाठिंबा स्पष्टपणे दर्शवला.

आपल्या आईचा विजयी आशीर्वाद घेताना कृष्णा भाऊ बहारे
किरण भाऊ बहारे हे प्रभागातील जनतेच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी राहणारे, लोकांपर्यंत पोहोचून समस्यांना भिडणारे लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. म्हणूनच प्रभागातील नागरिक “विकासासाठी घराबाहेर येणारा नेता हवा” या भावनेने एकदिलाने त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. “मुंबई–पुण्यातून सूत्र हलत नाहीत; लोकांमध्ये मिसळूनच काम होते” अशी भावना व्यक्त करत जनतेने किरण भाऊंना स्पष्ट पसंती दर्शवली. नामांकन दाखल केल्यानंतर प्रभाग क्रमांक तीनमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णा भाऊ बहारे यांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. प्रभागातील सर्व समाज, सर्व घटक यांना सोबत घेऊन काम करणारे, न्याय्य आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून किरण भाऊ बहारे प्रभागाचा आशेची आशेचा किरण बहारे आहे. अशी प्रभाग 3 मध्ये चर्चा चालू आहेत.