प्रभाग क्रमांक 15-अ मधून उच्च शिक्षित उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मनोहर निकम हे नगरसेवक पदासाठी आज दाखल करणार नामांकन अर्ज
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 अंतर्गत प्रभाग क्रमांक 15-अ मधून उच्च शिक्षित उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मनोहर निकम हे नगरसेवक पदासाठी आज आपले नामांकन अर्ज आज दाखल करणार आहेत. आज सकाळी 10:30 वाजता भगवा चौक येथे कार्यकर्ते आणि जनसमुदायाचा जमाव होणार असून, तेथून 11:00 वाजता नगर परिषद कार्यालयाकडे प्रचंड उत्साहात रवाना होणार आहे.

प्रशांत निकम यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये विकासाभिमुख आणि स्वच्छ प्रशासनासाठी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. समाजातील विविध स्तरांतील नागरिक, व्यावसायिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थनार्थ उपस्थित राहणार असल्याचे दिसून येत आहे. उच्च शिक्षण, उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि सामाजिक कार्यातील सातत्य या बळावर प्रशांत निकम यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक 15-अ मध्ये चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे. “ज्ञान, उद्योग आणि समाजसेवा यांचा संगम म्हणजे प्रशांत भाऊ निकम,” असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.