न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग 18 ब मध्ये बदलाची नवी चाहूल श्रीमती शशिकला सुभाष महाजन जनतेच्या आशेचा किरण!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 18 ब मध्ये बदलाची नवी चाहूल श्रीमती शशिकला सुभाष महाजन जनतेच्या आशेचा किरण!

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 ब मध्ये श्रीमती शशिकला सुभाष महाजन यांच्या उमेदवारीने नवचैतन्य निर्माण केले आहे. साध्या, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या शशिकलाताई समाजाशी घट्ट नातं जोडून काम करणाऱ्या महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या मुलगा आणि नातू यांचे लोकांशी असलेला मोठा जनसंपर्क, अनुभव आणि त्यांच्या विनम्र, संवादशील स्वभावामुळे त्या जनतेच्या मनात वेगळी छाप पाडत आहेत.

शशिकलाताई यांनी नेहमीच प्रभागातील सामान्य महिलांच्या अडचणी, समस्या आणि हक्कांविषयी आवाज उठवला आहे. त्यामुळे प्रभागातील महिला वर्ग त्यांना “आपल्यासारखीच, पण धैर्याने उभे राहणारी स्त्री” म्हणून पाहत आहे. नागरिकांमध्ये आज एक विश्वास निर्माण झाला आहे की, प्रभाग 18 ब मध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा आवाज ताकदीने मांडणारे नेतृत्व म्हणजे शशिकलाताई सुभाष महाजन.

“बदल हवा तर शशिकलाताईंचं नेतृत्व आवश्यकच!” असा सूर आता जनतेतून उमटू लागला आहे.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन, प्रभागाचा विकास आणि महिलांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा निर्धार आहे. शांतपणे पण ठामपणे काम करणाऱ्या या नेतृत्वाकडे आज संपूर्ण प्रभाग आशेने पाहतो आहे. अमळनेरच्या प्रभाग 18 ब मध्ये शशिकलाताईंच्या उमेदवारीमुळे नव्या परिवर्तनाची पहाट उगवण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!