अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग 3 मधून किरण भाऊ बहारे यांना जनतेचा जबरदस्त प्रतिसाद…
अमळनेर : विक्की जाधव.
आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 3 मधून कृष्णा रामसिंग बहारे (किरण भाऊ बहारे) हे नाव आज प्रत्येकाच्या ओठावर चर्चेत आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असलेले किरण भाऊ हे युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या अपेक्षांचे केंद्र बनले आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांत प्रभागातील विविध सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
सत्ता नसतानाही सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणारे, गरिब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या सुखदुःखात उपस्थित राहणारे किरण भाऊ हे खर्या अर्थाने जनतेचे जनसेवक आहेत.
त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सर्वांना समान सन्मान देण्याच्या वृत्तीमुळे त्यांना प्रभाग 3 च्या जनतेचा प्रचंड विश्वास मिळत आहे. प्रभागात ते नेहमी लोकांमध्ये राहून समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतात, हीच त्यांची ताकद मानली जात आहे.
आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये एक वेगळे चित्र दिसते प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वस्तीमध्ये “आपला माणूस किरण भाऊ बहारे!” असा आवाज घुमत आहे.
तरुणाईत जोश, महिलांमध्ये आत्मीयता आणि ज्येष्ठांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांचा एकच विश्वास किरण भाऊंच्या नेतृत्वाखालीच प्रभागाचा खरा विकास शक्य आहे.