न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग 13 च्या मतदारांचा निर्धार सुनील भाऊ महाजन सारखा उच्चशिक्षित उमेदवाराची होतेय मागणी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 13 च्या मतदारांचा निर्धार सुनील भाऊ महाजन सारखा उच्चशिक्षित उमेदवाराची होतेय मागणी..

 

 ना.. दारू” ना.. मटन” उच्चशिक्षित उमेदवाराचेच मतदार दाबतील बटन.

 

अमळनेर : विक्की जाधव.

आगामी अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 13 ब मधून सुनिल दयाराम महाजन हे “फक्त पदासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने परिवर्तनासाठी उमेदवारी” घेऊन राजकीय रणांगणात उतरले आहेत. स्वेच्छा सेवेतून निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल असलेले सुनिल भाऊ हे अनुभव, प्रामाणिकता आणि जनसेवेची भावना या त्रिसूत्रीवर लोकांसमोर नवा आदर्श उभा करत आहेत. MA (इतिहास), D.Ed., SET (इतिहास), डबल PET, ट्रिपल BA अशी प्रभावी शैक्षणिक पात्रता आणि प्रशासकीय कामाचा समृद्ध अनुभव यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विशेष ठरत आहे.

“पद आणि पैसा हवा असता तर नोकरीच केली असती, पण मला हवाय बदल…!” असं स्पष्ट सांगत सुनिल भाऊ जनतेसमोर वेगळी विचारधारा मांडत आहेत. पाणी, गटारी, लाईट, मच्छर, मोकाट जनावरे, कचरा या मूलभूत समस्या गेल्या अनेक दशकांपासून सुटत नाहीत, कारण “आपण निवडून दिलेला उमेदवार योग्य नसेल, तर बदल कसा होणार?”

 

 “नो पॅग, नो मटण  योग्य व्हिजनवरच दाबा बटण” हे त्यांचे घोषवाक्य लोकांच्या मनाला भिडत आहे.

प्रभाग 13 ब मध्ये आज एकच नाव चर्चेत आहे  सुनिल भाऊ महाजन. शांत, प्रामाणिक आणि २४ तास लोकसेवेसाठी तत्पर असणारे हे उमेदवार लोकांच्या आशा-अपेक्षांचे प्रतीक बनले आहेत.

“उच्चशिक्षित, प्रामाणिक आणि गोरगरिबांच्या वेदना समजणारा उमेदवारच खऱ्या विकासाची हमी देऊ शकतो” असा सूर जनतेतून उमटतो आहे. अमळनेरच्या जनतेला आज असा विश्वास वाटू लागला आहे की, प्रभाग 13 ब मध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नवी पहाट सुनिल भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली उगवू शकते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!