प्रभाग 15-अ मध्ये उच्चशिक्षित उमेदवार प्रशांत निकम यांच्या उमेदवारीने वाढणार राजकीय चळव
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 15-अ मधून उच्चशिक्षित, तरुण आणि विकासाभिमुख उमेदवार प्रशांत मनोहर निकम (B.E. Civil, LL.B.) यांच्या उमेदवारीने प्रभागात नवा उत्साह निर्माण केला आहे. सामाजिक भान, औद्योगिक अनुभव आणि शैक्षणिक पात्रता या त्रिसूत्रीमुळे प्रशांत भाऊ हे या निवडणुकीतील प्रभावी आणि चर्चेतील व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. “विकास आणि परिवर्तनासाठी सर्व नागरिकांचे मार्गदर्शन व आशीर्वाद आवश्यक” म्हणूनच प्रशांत भाऊ हे केवळ उमेदवार नसून एक सामाजिक कार्यकर्ते आणि संवेदनशील नागरिक म्हणून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व आहेत. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणारे, प्रभागातील समस्यांना थेट भिडणारे आणि विकासासाठी ठोस धोरण मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. “प्रशांत भाऊंची उमेदवारी जाहीर झाल्यापासून अनेकांच्या मनात धडकी भरली” अशी चर्चा प्रभागभर रंगली आहे.
उच्च शिक्षण आणि प्रशासकीय दृष्टिकोन असलेले प्रशांत निकम हे युवकांसाठी आदर्श ठरत आहेत.
त्यांची कार्यशैली पारदर्शक, योजनाबद्ध आणि जनसंपर्कावर आधारित आहे. लोकांच्या हितासाठी निःस्वार्थपणे काम करण्याची त्यांची वृत्ती पाहता प्रभाग 15-अ मध्ये “विकास हवा असेल, तर प्रशांत भाऊंचं नेतृत्वच योग्य” असा सूर उमटू लागला आहे. जनतेचा वाढता प्रतिसाद आणि नागरिकांचा विश्वास पाहता, या निवडणुकीत प्रभाग 15-अ मध्ये प्रशांत निकम हे बदलाचे प्रतीक ठरू शकतात.