ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांचेकडून संगणक प्रमाणपत्र वाटप सोहळा संपन्न.
संगणक शिकणे ही काळाची गरज आहे – नितीन बोधे सर.
प्रतिनिधी -विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – महात्मा फुले विकास महामंडळ तर्फे अनुसूचित जाती (एससी) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व तीन हजार रुपये स्कॉलरशिप मंडळाकडून देण्यात येते या मंडळा अंतर्गत TM e2E Academy pvt. ltd. Hyderabad व ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे 60 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील 40 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.स्वातीताई पवार विद्यमान सरपंच गोपाळवाडी दौंड तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नानवीज पोलीस ट्रेनिंग सेंटर पीआय नितीन बोधे सर यांनी संगणक संगणक शिकणे ही काळाची गरज आहे जगाबरोबर चालायचे असेल तर संगणक शिकणे अतिशय आवश्यक आहे असे आव्हान या कार्यक्रमावेळी केले ,मंगेश मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुरवडे सर यांनी संगणका बद्दलचे महत्त्व जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले तसेच या कार्यक्रमाच्या वेळी मा. सरपंच जयसिंग दरेकर गोपाळवाडी , ग्रामपंचायत सदस्य सौ.वैशालीताई शिंदे पत्रकारराजेंद्र सोनवलकर, गोपाळवाडी ग्रामपंचायतचे मा. तंटामुक्त अध्यक्ष भीमराव चोरमले ,रोटरी क्लबचे सदस्य चांगदेव शेलार ,गणेश हाके ,सुरेश काळे रघुनाथ सुळ, शरद धेंडे , अजय बनसोडे प्रथमेश रणदिवे कार्यक्रमाला उपस्थिती होते या कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव रणदिवे संस्थापक अध्यक्ष यांनी केले यावेळी संस्थेची माहिती देण्यात आली संस्थेच्या वतीने कॅम कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर ,इरा किड्स प्ले स्कूल, प्रगती मॉन्टेसरी कोर्स इत्यादी उपक्रम सुरू आहेत.
लवकरच तीन हजार रुपये स्कॉलरशिप मंडळ तर्फे विद्यार्थ्यांच्या बँक account मध्ये जमा होईल असे सांगितले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , विशेष प्रस्ताविक व विशेष सहकार्य एडवोकेट किशोर टेकवडे यांनी केले व आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व प्रमुख पाहुण्यांचे आभार संस्थेच्या सचिव सौ.वैशाली रणदिवे मानले.