प्रभाग क्रमांक ३ मध्ये जनतेचा निर्धार किरण भाऊ बहारेच करतील विजयाचा ‘बहार’
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. या प्रभागातून कृष्णा रामसिंग बहारे (किरण भाऊ) उद्या गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आपले नामांकन पत्र दाखल करणार आहेत. या वेळी सर्व हितचिंतक व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभागातील नागरिकांमध्ये आता एकच चर्चा रंगली आहे “घरबसल्या विकास होत नाही, जनतेत मिसळणाऱ्यांनाच जनता पसंत करते!” किरण भाऊंच्या जनसंपर्कातून, प्रभागातील प्रत्येक समस्येत त्यांनी घेतलेला सहभाग आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे प्रभाग तीनमध्ये त्यांच्या नावाचीं चर्चा होत आहे.
जनतेचा सूरही स्पष्ट आहे “यावेळी प्रभाग क्रमांक ३ मधून किरण भाऊ बहारे यांचा विजय निश्चित!”
अनेक वर्षांपासून प्रभागातील प्रश्नांसाठी झटणारा, जनतेत कायम राहणारा आणि खऱ्या अर्थाने जनसेवक म्हणून ओळखला जाणारा किरण भाऊ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभतो आहे.
निवडणुकीपुरते समाजकारण करणारे, दिखाऊ समाजसेवक आता जनतेच्या रडारवर आले आहेत. नागरिकांमध्ये मत बनले आहे की प्रभागाचा विकास केवळ मंचावरून नव्हे तर मैदानात उतरणाराचं करणार!
प्रभाग ३ मध्ये या नामांकनानेच निवडणुकीच्या लढतीची दिशा स्पष्ट होणार, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
“जनतेचा आवाज… किरण भाऊ बहारेच प्रभाग क्रमांक ३ चा करणार विकास!”