न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, जंगलातून २४ मोटारसायकली केल्या जप्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, जंगलातून २४ मोटारसायकली केल्या जप्

जबाबदार पोलीस निरीक्षकाची आपल्या कर्मचाऱ्यांप्रती अशीही कार्यतत्परता.

 

अमळनेर विक्की जाधव.

पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिसांनी केलेल्या शिताफीच्या कारवाईत दोन सराईत चोरट्यांसह तब्बल १६ लाखांच्या २४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरासह परिसरात सुरू असलेल्या मोटारसायकल चोरीच्या मालिकेला आता आळा बसला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी अमळनेर पोलिस पथकाचे कौतुक करत रोख बक्षीस जाहीर केले.

गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्वलकुमार म्हस्के, नितीन मनोरे, उज्वल पाटील, हितेश बेहरे यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सातत्यपूर्ण तपास केला. सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक सूत्रांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत अखेर शहादा तालुक्यातील हिम्मत रेहंज्या पावरा व अंबालाल भुरट्या खर्डे या दोघांना जंगल परिसरातून पकडण्यात यश आले. आरोपींनी विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या मोटारसायकली विकल्याची कबुली दिली.

 या कारवाईत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनीही बजावली होती महत्त्वाची भूमिका..

निकम यांच्या मार्गदर्शकाखाली गुन्ह्यातील आरोपी चा सुगावा घेण्यासाठी निघालेल्या टीमचा घनदाट सातपुड्याच्या जंगलात अचानक झाला होता सर्वांचा संपर्क बंद विषयाची गांभीर्यता लक्षात घेता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सकाळी 5:30 वा तत्काळ गाठले होते शहादा, तळोदा आणि जंगल परिसर त्यांच्या आपल्या कर्मचाऱ्यांप्रती कार्यतत्परतेमुळे अमळनेर शहरातून विविध माध्यमातून कौतुक होत आहे. 

या कारवाईत जंगलातून सर्व २४ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या धाडसी कामगिरीमुळे अमळनेर पो. स्टे.चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे नाव पुन्हा एकदा गाजले असून नागरिकांनीही पोलिस दलाचे कौतुक केले आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील व सागर साळुंखे करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!