न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

आ. अनिल दादा पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची धुरा आगामी स्थानिक निवडणुकांसाठी पक्षाला नवी ऊर्जा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

आ. अनिल दादा पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची धुरा आगामी स्थानिक निवडणुकांसाठी पक्षाला नवी ऊर्जा.

 

अमळनेर : विक्की जाधव.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल टटकरे यांच्या आदेशानुसार आ. अनिल दादा पाटील यांना महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरत असून, या निमित्ताने अमळनेरमध्ये दादांच्या समर्थकांत आणि कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

आ. अनिल दादा हे पक्षनिष्ठ, संघटनप्रिय आणि लोकसंपर्कात नेहमी अग्रस्थानी राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री म्हणून केलेले कार्य आजही जनतेच्या मनात घर करून आहे.

आता प्रवक्तेपदाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्यांपर्यंत पक्षाच्या धोरणांचा प्रसार आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडण्याची जबाबदारी ते सांभाळणार आहेत. त्यांची ही नियुक्ती आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी पक्षासाठी मोठी ऊर्जा ठरणार आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!