न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रतापच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक मेळावा – ५१ वर्षांनी पुन्हा एकत्र!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रतापच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक मेळावा  ५१ वर्षांनी पुन्हा एकत्र

 

अमळनेर : विक्की जाधव.

प्रताप हायस्कूल, अमळनेर मध्ये 1974 साली शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. पाच दशकांहून अधिक काळानंतर आपल्या जुन्या प्रताप हायस्कूल यां शाळेच्या आवारात पाऊल ठेवताना सर्वांच्या डोळ्यांत भावनांचा पूर दाटला. वर्गखोल्यांपासून ते खेळाच्या मैदानापर्यंत प्रत्येक ठिकाणी जुने दिवस पुन्हा जागे झाल्यासारखे वाटले.

देश-विदेशातील विविध ठिकाणी कार्यरत असलेले हे विद्यार्थी आपापल्या जबाबदाऱ्यांत व्यस्त असूनही, जुन्या मैत्रीचा धागा जपण्यासाठी एकत्र आले. त्यांनी प्रताप कॉलेज, प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, आंबाऋषी टेकडी आणि परिसरातील इतर ठिकाणी भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. हशा, गप्पा, जुन्या गोष्टी आणि एकमेकांच्या यशस्वी प्रवासाच्या आठवणींनी वातावरण भारावले.

कार्यक्रमात “प्रतापने दिलेली शिस्त आणि संस्कार हाच आमच्या यशाचा पाया आहे,” असा भावनिक सूर सर्वांच्या मनात झंकारला. शेवटी सर्वांनी पुन्हा दरवर्षी भेटायचे ठरवत, आपल्या ‘प्रताप हायस्कूल चे त्या दिवसांचे बंध’ अजून घट्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!