न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची ‘भारत जागृत मंच’ची मागणी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची ‘भारत जागृत मंच’ची मागणी

अमळनेर : विक्की जाधव.

राज्यात वाढत्या प्रेमविवाहाच्या घटनांमुळे निर्माण होणारे सामाजिक असंतुलन आणि कौटुंबिक मतभेद लक्षात घेता ‘भारत जागृत मंच’ तर्फे प्रेमविवाहासाठी आई-वडील व पालकांची संमती बंधनकारक करणारा कायदा तातडीने लागू करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

मंचाने शासनाला पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रेमसंबंधांमुळे अनेक गंभीर गुन्हे, फसवणूक आणि आत्महत्यांसारख्या घटना वाढीस लागल्या असून, यामुळे समाजातील कुटुंबीयांवर मानसिक ताण निर्माण होत आहे. विवाह नोंदणीच्या वेळी पालकांची लेखी संमती अनिवार्य करावी, संमतीशिवाय विवाह करणाऱ्यांना संपत्तीहून बेदखल करण्याचा अधिकार पालकांना द्यावा, तसेच संशयास्पद प्रेमविवाहांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर संस्था आणि विवाह नोंदणी केंद्रांवर तपासणी करावी, अशा तीन प्रमुख मागण्या मंचाने केल्या आहेत.

या संदर्भात ‘भारत जागृत मंच’ तर्फे आज (दि. 9 नोव्हेंबर 2025) अमळनेर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात मा. ना. कॅबिनेट व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मंचाचे राज्याध्यक्ष संतोष बाबुराव पाटील, स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन, सामाजिक कार्यकर्ते संदीप युवराज पाटील तसेच असंख्य पालक उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!