सौ. सपना बापू चौधरी यांच्या उमेदवारीने प्रभाग 9 अ मध्ये नवचैतन्याचा उत्साह
अमळनेर : विक्की जाधव
नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 अ (महिला राखीव) मधून सौ. सपना बापू चौधरी यांच्या उमेदवारीची घोषणा होताच संपूर्ण वॉर्डात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या, प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीच्या सौ. सपना चौधरी नागरिकांच्या मनात आशेचा किरण ठरत आहेत.

राजू बापू चौधरी यांचा तगडा जनसंपर्क ठरणार सपनाताईंसाठी नगरसेवक पदाचे स्वप्न होणार पूर्ण..
कोरोनाकाळात समाजसेवा, रक्तदान, तसेच अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत अशा अनेक सामाजिक उपक्रमांत राजू (बापू) चौधरी यांनी निभावलेली भूमिका उल्लेखनीय राहिली आहे. त्याच सेवाभावाचा वारसा सौ. सपना चौधरी पुढे नेत आहेत. “रस्ता, पाणी, वीज आणि सुशोभीकरण” हा त्यांचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असून, स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर वॉर्ड निर्माण करण्याचा त्यांचा दृढ निर्धार आहे.
महिलांच्या नेतृत्वाची नवी दिशा देणाऱ्या सौ. सपना चौधरी यांना सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हिंदू-मुस्लिम समाजातील सौहार्द, बंधुभाव आणि एकता जोपासण्यात राजू चौधरी यांचे मोठे योगदान राहिले आहे. तणावाच्या काळातही दोन्ही समाजातील तरुणांना एकत्र आणून शांतता प्रस्थापित करण्यात राजू चौधरी यांचे मोठे योगदान होते असे व्यक्तिमत्व आज प्रभाग 9 अ मध्ये एकता आणि विकासाचे प्रतीक ठरले आहे.
आता मतदारांनीच बदल करायचं ठरवलंय..
“विकासाची नवी दिशा, महिलांच्या नेतृत्वाची नवी आशा सौ. सपना बापू चौधरी आमच्या वॉर्डाची विश्वासाची दिशा!”