प्रभाग 17 मध्ये दादा पवारांचा दबदबा ३५ वर्षांच्या सेवाभावाची शिदोरी घेऊन रणांगणात उतरणार!
“दादा पवार येणार, विकासाचा झेंडा फडकणार!”
अमळनेर : विक्की जाधव.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा बिगुल वाजला असून, प्रभाग क्रमांक 17 मध्ये चर्चेचा विषय एकच साहेबराव वसंत पवार (दादा पवार)! गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि लोकसेवेच्या कार्यात अग्रेसर राहिलेले दादा पवार यांची आजही प्रभागातील प्रत्येकाशी जोडलेले नाळ व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाते. वैचारिक विरोधक नसलेले, पण जनतेत प्रचंड प्रेमाने स्वीकारलेले नाव म्हणजे दादा पवार. त्यांच्या सॉफ्ट राजकारणाची आणि शांत नेतृत्वशैलीची चर्चा आजही अमळनेरभर रंगली आहे. प्रत्येकाच्या सुखा दुःखात, प्रत्येक आनंदात हजर असणारे पवार कुटुंबीयांचे समाजाशी असलेले नाते आजही आदर्शवत आहे.

३५ वर्षांचा सेवाभाव, लोकांतील विश्वास आणि आपुलकीचा वारसा दादा पवार प्रभाग 17 ब. गाजवणार!
“दादा पवार म्हणजे फक्त राजकारणी नाहीत, तर वेळोवेळी मदतीला धावून येणारे, मार्गदर्शन करणारे आणि एकत्र घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहेत.” प्रभाग क्रमांक 17 ब मध्ये त्यांच्या उमेदवारीनंतर नागरिकांचा उत्साह वाढला आहे.