न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रताप कॉलेज ते तांबेपुरा मार्गावर ट्रक उलटला! नागरिकांमध्ये संतापाची लाट भूमिपूजन होऊन देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप कॉलेज ते तांबेपुरा मार्गावर ट्रक उलटला! नागरिकांमध्ये संतापाची लाट भूमिपूजन होऊन देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील विकासकामांचा गाजावाजा सुरू असतानाच, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट बनली आहे. प्रताप कॉलेज ते तांबेपुरा भागातील विप्रो कंपनीकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत असून, अखेर काल या रस्त्यावर एका ट्रकचा अपघात झाला.

रस्त्याची दयनीय अवस्था, खोल खड्डे यामुळे वाहनचालकांचा त्रास वाढला असून, काल एक ट्रक उलटला मोठा अनर्थ टळला हेच सुदैव. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “हा अपघात नव्हे तर प्रशासनाच्या आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या बेफिकीरीचा परिणाम आहे.” या रस्त्याचे दोन वेळा भूमिपूजन होऊनही कामाची प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. तांबेपुरा, बंगाली फाईल, आयोध्या नगर, प्रताप नगर, स्टेशन रोड या परिसरांतील नागरिक आता असे बोलू लागले आहेत.

ट्रक उलटल्याने शहरात चर्चेचा विषय रंगला असून “रस्ता दुरुस्तीशिवाय भूमिपूजन करायचं का?” म्हणजे पुढाऱ्यांनी स्वतःचे फजिती करून घेतले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत असून प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होता आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!