अमळनेरात आज शिवसेनेचा निर्धार मेळावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती
अमळनेर विक्की जाधव
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अमळनेर शिवसेना पक्ष आयोजित “निर्धार मेळावा” नाट्यगृह मंदिर येथे पार पडणार आहे.

या मेळाव्याला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबरावजी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या मेळाव्यात पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या मेळाव्याचा उद्देश आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना संघटित करणे, शिवसेनेच्या विचारांवर ठाम राहून नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी पुढे जाण्याचा निर्धार करणे हा आहे.