न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

“प्रथम राष्ट्र, नंतर मी” जनसेवेच्या बळावर सुनील महाजन प्रभाग 13 ब. मधून मैदानात!

अपनी भाषा में पढ़े! Translate

“प्रथम राष्ट्र, नंतर मी” जनसेवेच्या बळावर सुनील महाजन प्रभाग 13 ब. मधून मैदानात

 

अमळनेर : विक्की जाधव.

“जात, पात, नाते-संबंध नव्हे… तर प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि जनसेवेची तळमळ हवी!”  या विचाराने प्रेरित होत सुनील दयाराम महाजन यांनी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025-30 मध्ये प्रभाग क्रमांक 13-ब (पुरुष गट) मधून उमेदवारी जाहीर केली आहे. समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे, निस्वार्थी आणि लोककल्याणासाठी नेहमी तत्पर असलेले महाजन हे प्रभागातील जनतेमध्ये आदराचे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व मानले जाते.

सुनील महाजन यांनी सदैव कायदेशीर चौकटीत राहून नागरिकांच्या समस्यांसाठी आवाज उठवला आहे. गरिबीची जाण असणारे, तरी पैशामागे न धावणारे आणि “सेवाच धर्म” या तत्त्वावर चालणारे महाजन हे शिक्षित, विचारशील आणि जनतेच्या अडचणीत नेहमी उभे राहणारे समाजसेवक आहेत. त्यांच्या मते, “राष्ट्रप्रेम आणि सेवाभाव या दोनच गोष्टींनी खरी प्रगती घडते.” आपल्या प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आणि नागरिकांच्या मुलभूत सोयीसुविधा यासाठी ठोस प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “आता वेळ आली आहे विचारपूर्वक मतदानाची,” असे आवाहन करत सुनील महाजन यांनी नागरिकांना विजयी आशीर्वाद देण्याची विनंती केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!