जनतेशी नाळ, सेवेत निष्ठा प्रभाग ७ साठी अविनाश भाऊ जाधव मैदानात!

अमळनेर : विक्की जाधव
“नाळ मातीशी, निष्ठा जनतेशी, प्रत्येकाच्या अडचणीत उभा राहतो पाठीशी!” या घोषवाक्याने प्रेरित होऊन प्रभाग क्रमांक ७ मधून अविनाश दगडू जाधव (अवि डिजे) यांनी अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-30 साठी उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्या प्रामाणिक, जनसंपर्कशील आणि कार्यतत्पर स्वभावामुळे अविनाश भाऊ जाधव हे परिसरातील जनतेत आधीपासूनच लोकप्रिय आहेत.

जनतेच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी राहणारे अविनाश भाऊ यांनी अनेक सामाजिक उपक्रमांतून लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. युवकांसाठी रोजगार, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना व्यापक पाठिंबा प्रभागातून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणे, आणि अमळनेरचा सर्वांगीण विकास घडवणे हीच माझी खरी इच्छा आहे,” असे अविनाश भाऊ जाधव यांनी सांगितले. आता प्रभाग ७ मध्ये निवडणुकीची चुरस रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.