रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सौर पंप बसवून मिऴावेत, ऊर्जा राज्यमंत्री ना. सौ. मेघनाताई बोर्डीकर यांचाकडे भाजपाचे अरुण धोबी यांची मागणी
शिरपुर : शिरपुर तालुका सह जिल्ह्यातील राज्य सरकार कडुन शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, परंतु शिरपुर सह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक महिन्यापासुन पैसे भरले आहेत, पण अद्याप त्यांना सौर पंप बसवून मिऴाले नाहीत, तरी अशा शेतकऱ्यांना तात्काळ सौर पंप बसवून मिऴावेत, असे राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री ना. सौ. मेघनाताई बोर्डीकर यांची (दि. ४ नोव्हें) रोजी मुंबईत मंत्रालय दालनात धुऴे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी भेट घेवुन निवेदन देवुन चर्चा केली. निवेदनाची प्रत राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुऴे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांना देण्यात आली आहे. ऊर्जा राज्यमंत्री ना. सौ. मेघनाताई बोर्डीकर यांना भाजपाचे अरुण धोबी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासुन शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी रक्कम भरली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना तत्काळ सौर ऊर्जा पंप बसवून द्यावेत. धुऴे जिल्ह्यातील शिरपुर, साक्री, शिंदखेडा व धुऴे या चार हि तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कुसुम ‘बी’ योजने अंतर्गत गेल्या अनेक महिन्यापासुन सौर पंप बसविण्यासाठी पैसे भरून ही पंप अद्याप बसवले गेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर पंप देण्याचे आदेश व्हावेत. आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी उपाय योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. तसेच ‘सूर्यघर’ योजना आणि सौर ऊर्जेचे फायदे अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. शेतकऱ्यांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी महावितरणचे पोर्टल, पुरवठादार पोर्टल आणि कॉल सेंटर कार्यरत करण्यात यावे. अशी मागणी धुऴे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री ना. सौ. मेघनाताई बोर्डीकर यांची मुंबईत मंत्रालय दालनात भेट घेवुन निवेदन दिले आहे.