१२ राज्यांमध्ये मतदार याद्यांची पडताळणी; दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून सुरू – महारास्ट्रासंदर्भात मोठी अपडेट वाचा.

मार्मिक न्यूज नेटवर्क : पत्रकार, विक्की जाधव.
निवडणूक आयोगाकडून देशातील मतदार याद्यांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर “सिस्टेमॅटिक वोटर लिस्ट रिव्हिजन (SIR)” मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, देशातील १२ राज्यांमध्ये एकाच वेळी मतदार याद्यांची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये नावे, पत्ते, वय, व नवीन मतदार नोंदणी यांसारख्या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे.

या टप्प्यात निवडणूक आयोगाने विविध जिल्हा प्रशासनांना आवश्यक सूचना देऊन मतदार याद्या अधिक पारदर्शक व अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानिक पातळीवर विशेष अधिकारी नियुक्त करून घराघर तपासणी तसेच ऑनलाइन पडताळणीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदारांना स्वतःची माहिती तपासण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टल आणि मोबाईल अॅपचा वापर करता येईल.
दरम्यान, या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्यातील मतदार याद्यांची तपासणी स्वतंत्र वेळापत्रकानुसार होणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून, लवकरच नव्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. 