ॲट्रॉसिटी चा कायदा अस्तित्वात आहे परंतु तो प्रभावीपणे राबविला जात नाही ही मोठी खंत, ॲट्रॉसिटी केस नोंदवण्यासाठी मोर्चे काढावे लागतात -पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे
प्रतिनिधी -विकी ओहोळ
8446119158
दौंड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे (सर) आपले विचार मांडले
अहिल्यानगर येथील सोनई गावात काही उपद्रवी लोकांनी मातंग समाजाच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून अमानुषपणे मारहाण केली,अलिकडेच फलटण मध्ये एका मागासवर्गीय महिला डॉक्टरवर पोलीस उपनिरीक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने आत्महत्या केली अशा खुप घटना रोज घडत आहेत. दलितांवरील अत्याचार वाढत आहेत, पिडीताना वर्षानुवर्षे न्याय मिळत नाही. दलितांच्या रक्षणासाठी असलेला ॲट्रॉसिटी चा कायदा अस्तित्वात आहे परंतु तो प्रभावीपणे राबविला जात नाही अशी खंत व आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे (सर) यांनी दौंड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याबाबत कवाडे म्हणाले की, महायुतीचा मित्रपक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीने लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयासाठी परिश्रम घेतले. त्यामुळे महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मित्र पक्षांना आश्वासित केलेले आहे. आगामी निवडणुकांमध्ये आरक्षित जागेवर आमच्या पक्षाला संधी द्यावी, म्हणजेच नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला स्थान मिळावे आणि जर असे झाले नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा कवाडे सरांनी सरकारला दिला आहे. दलित समाजावर होणारे अन्याय, अत्याचारांची दखल सरकारने घ्यावी. घटनेतील पिडीतांना पोलीस सहकार्य करीत नाहीत, न्यायासाठी वर्षानुवर्ष गुन्हे कोर्टात चालतात यासाठी गुन्हे जलद गती न्यायालयात चालविण्यात यावेत आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा प्रभावीपणे राबविला पाहिजे. ॲट्रॉसिटी कायदा दलितांचे रक्षण करण्यासाठी आहे इतरांना त्रास देण्यासाठी नाही हे ध्यानात घ्यावे.
फलटण येथील घटनेची सखोल चौकशी व्हावी याकरिता एसआयटी मार्फत तपास व्हावा अशी मागणी करणार आहे. पत्रकारपरिषदे दरम्यान
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे तसेच पक्षाचे पदाधिकारी राजू जाधव, संजय आढाव, मनोहर सोनवणे, संजय गायकवाड, सुनील थोरात, प्रमोद राणेरजपूत, किशोर पाटोळे, चंद्रकांत सोनवणे तसेच माजी उपनगराध्यक्ष अनिल सोनवणे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.