न्यूज
ब्रेकिंग

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

अमळनेरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!  चौधरी यांच्यानंतर अॅड. ललिता शाम पाटील यांचा शिंदे सेनेत प्रवेश..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!  चौधरी यांच्यानंतर अॅड. ललिता शाम पाटील यांचा शिंदे सेनेत प्रवेश.

 

अमळनेर : विक्की जाधव.

आगामी काळात अमळनेरच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना समोर आली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करून राजकीय समीकरणांमध्ये खळबळ उडवली होती. त्यानंतर आता अॅड. ललिता शाम पाटील यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश करून या हालचालीला आणखी वजन दिलं आहे.

मुंबईतील मुक्तगिरी बंगला, मलबार हिल येथे पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल पाटील, तसेच अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी अॅड. पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाशी असलेली नाळ तोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला. त्यांच्या या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणं आकार घेण्यास सुरुवात झाली आहे.

 

राज्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक घडामोडींमध्ये अमळनेरचा सहभाग अधिक दृढ होत असल्याचं मानलं जात आहे. माजी आमदार शिरीष चौधरी आणि अॅड. ललिता पाटील यांच्या सलग प्रवेशामुळे शिंदे सेनेचं अमळनेरमधील बळ अधिक मजबूत झालं असून, येणाऱ्या निवडणुकांपूर्वी या बदलांचा मोठा राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!