देशाच्या नेतृत्वावर व समाजाच्या साथीनं आत्मनिर्भर भारत घडवूया — अनिलजी भालेराव

अपनी भाषा में पढ़े! Translate

देशाच्या नेतृत्वावर व समाजाच्या साथीनं आत्मनिर्भर भारत घडवूया — अनिलजी भालेरा

 

अमळनेर : विक्की जाधव 

विजयादशमी शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने संत सखाराम महाराज नगरात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास देवगिरी प्रांत संघचालक अनिलजी भालेराव, नगर कार्यवाह देवेंद्र तायडे व हृदयरोग तज्ञ डॉ. विक्रम पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शस्त्रपूजन व स्वयंसेवकांच्या घोष प्रात्यक्षिकाने झाली.

डॉ. पाटील यांनी सांगितले की, “संघाची शंभर वर्षांची वाटचाल ही राष्ट्रनिर्मितीचा आत्मसाक्षात्कार आहे.”तर प्रांत संघचालक भालेराव म्हणाले, “डॉ. हेडगेवारांनी संघ स्थापनेद्वारे समाजाला आत्मभान दिले. शाखा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची शाळा आहे. प्रत्येक स्वयंसेवकाने समाज व राष्ट्रहितासाठी तन, मन, धनपूर्वक योगदान द्यावे.”शेवटी सर्व स्वयंसेवकांनी “देश परमवैभवाला नेण्याची शपथ” घेत प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता केली. प्रास्ताविक प्रमोद पवार, सांघिक गीत लोकेश महाजन, परिचय सुनील महाजन,अमृत वचन स्वप्निल कुलकर्णी, वैयक्तिक गीत विजय पाटील यांनी म्हटले.कार्यक्रमासाठी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ, डॉ. अनिल शिंदे, प्रा.डी. डी. पाटील ,जिजाबनाना पाटील,शहरातील सर्व संघ स्वयंसेवक व संघ परिवाराचे परिवाराचे पदाधिकारी,माता-भगिनी, उपस्थित होत्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!