दिव्यामुळे लागली घराला आग अग्निशमन दलाची धावपळ; काही क्षणांत आगीवर नियंत्रण

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिव्यामुळे लागली घराला आग अग्निशमन दलाची धावपळ; काही क्षणांत आगीवर नियंत्र

विद्याविहार कॉलनीतील ठाकरे व्हिला शेजारी लागली आग; जीवितहानी टळली.

 

अमळनेर : विक्की जाधव. 

विद्याविहार कॉलनीतील ठाकरे व्हिला शेजारील रवींद्र मोतीराम पाटील यांच्या घराला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

सदर घर त्या वेळी बंद असल्याने धुराचे लोट उसळताना नागरिकांच्या नजरेस पडले. स्थानिक नागरिकांनी आणि प्रभागातील नगरसेवक रवी पाटील यांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले आणि काही वेळातच दल घटनास्थळी दाखल होऊन तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घरातील फर्निचर सह काही भागाचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यावेळी विद्याविहार कॉलोनी प्रभागातील नगरसेवक रवी पाटील स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!