दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या मेळाव्यात स्वबळावर लढण्याचा निर्धार.- कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल खराडे.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड येथे तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस तसेच सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्यात “काँग्रेस स्वबळावर लढणार” असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. हा मेळावा दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल खराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व निरीक्षक प्रशांत शेठ सुरसे हे या वेळी विशेष उपस्थित होते. त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
दौंड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीश ओझा, तसेच श्नेयश मनोत, नानासाहेब रणदिवे, बाळासाहेब दळवी, अरविंद दोरगे, इस्माईल पठाण, प्रकाश सोनवणे, पवार सर, महेश जगदाळे, दिगंबर चिलवंत, अल्ताफ शेख, मोशीन तांबोळी, अतुल थोरात, रज्जाक शेख, महेश ताकवले, हाके सर, adv. डेगळे, पठारे, सस्ते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील काळात स्थानिक प्रश्न, निवडणूक तयारी, मतदार संपर्क मोहीम आणि पक्ष संघटन बळकट कसे करायचे यावर सविस्तर चर्चा झाली. सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेशी संवाद साधत आगामी निवडणुकांत विजयी होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.