“तनावमुक्त जीवनाकडे एक पाऊल” लायन्स क्लब अमळनेरतर्फे विशेष सेमिनाराचे आयोजन 

अपनी भाषा में पढ़े! Translate

“तनावमुक्त जीवनाकडे एक पाऊल” लायन्स क्लब अमळनेरतर्फे विशेष सेमिनाराचे आयोजन 

 

अमळनेर : विक्की जाधव.

आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात ताणतणाव हे जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब अमळनेरतर्फे “तनावमुक्त व्यवस्थापन” या विषयावर रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सुजान मंगल कार्यालय येथे मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

या सेमिनारमध्ये धुळे येथील ख्यातनाम मानसोपचार तज्ञ डॉ. रोहन शाह हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. “ताणावर नियंत्रण, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक संतुलन” या विषयांवर ते सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने मार्गदर्शन करतील.लायन्स क्लब अमळनेरने नागरिकांना मानसिक आरोग्य आणि आनंदी जीवनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. नागरिकांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून काही क्षण स्वतःसाठी देत या सेमिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!