डॉ काशिनाथ सोलनकर यांनी राबवले कर्मवीरांच्या विचारांचे जागर अभियान ;सहा हजार ग्रामस्थ व विद्यार्थ्यांपर्यंत नेले कर्मवीरांचे कार्य.

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ काशिनाथ सोलनकर यांनी राबवले कर्मवीरांच्या विचारांचे जागर अभियान ;सहा हजार ग्रामस्थ व विद्यार्थ्यांपर्यंत नेले कर्मवीरांचे कार्य.

(निलेश गायकवाड)

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर व्याख्याते काशिनाथ सोलनकर यांनी ‘कर्मवीर विचारांचा जागर’ हे अभियान राबवले.
डॉ काशिनाथ सोलनकर यांनी शिरूर तालुक्यातील कवठेयमाई,मलठण, बारामती तालुक्यातील मोरगाव,मुर्टी, पुरंदर तालुक्यातील निरा, सातारा जिल्ह्यातील पळशी ता.माण या विविध शाळांमधून आपल्या व्याख्यानाद्वारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचे वेगळेपण पटवून दिले.त्यांनी याकरिता एक हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून पाच ते सहा हजार विद्यार्थी व ग्रामस्थांपर्यंत कर्मवीरांचे कार्य व चरित्र पोहचविले. ते भिगवण गावचे रहिवाशी आहेत.
‘कर्मवीर विचारांचा जागर’ अभियानात त्यांनी विविध ठिकाणी जाऊन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बी एन पवार,पुणे विभागाचे इन्स्पेक्टर संजय मोहिते, रयतचे माजी विद्यार्थी पुणे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे,जनरल बॉडी सदस्य
लालासाहेब नलवडे,आर. व्ही.जगदाळे,अशोक जगदाळे,बी एस खाडे,मोरगावचे सरपंच पोपट तावरे,निलेश केदारी,
माजी विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, कवठे यमाईतील दानशूर व्यक्तिमत्व रितेश शहा,नीरा येथील लक्ष्मणराव चव्हाण,माजी बांधकाम सभापती दत्तात्रय चव्हाण मलठण येथील विलासराव थोरात,आर टी ओ अधिकारी हर्षदा खारतोडे यांच्याशी सोलनकर यांनी सुसंवाद साधला.
आपल्याला मिळालेले मानधन व प्रवास खर्च त्याच विद्यालयाला देणगी स्वरूपात काशिनाथ सोलनकर यांनी दिल्याने विविध गावातील ग्रामस्थांनी त्यांचे विशेष कौतुक केले. काशिनाथ सोलनकर गेल्या दहा वर्षांपासून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य गावाशहरांत पोहोचवत आहेत.यापूर्वीही त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वेगळेपणावर शंभरहून अधिक व्याख्याने दिलेली आहेत.
त्यांना या अभियानाकरीता रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हनुमंतराव वाबळे, शेटफळगढे येथील बापूराव वाबळे,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे,अनिल वाबळे, इंदापूर मार्केट कमिटीचे संचालक संतोष वाबळे, प्राचार्य जितेंद्र गावडे, रयत बँकेचे माजी चेअरमन देविदास गुरव,रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे,
रयतचे आजीव सदस्य अर्जुन मलगुंडे,प्राचार्य जगदीश टिकले ,प्राचार्य अर्जुन कोकरे, प्राचार्य अनिल धुमाळ,मुख्याध्यापक बबन कुतवळ, मुख्याध्यापक एस आर ननावरे, नितीन खाडे , प्राचार्य जयश्री आसवले, संगणक अभियंते जालिंदर बंडगर,दादा शेंडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!