तक्रारवाडी येथील नितीन काळंगे यांनी फसवणूकीच्या व्यवहारात राजेगाव च्या विजय ढमे यांच्यावर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

तक्रारवाडी येथील नितीन काळंगे यांनी फसवणूकीच्या व्यवहारात राजेगाव च्या विजय ढमे यांच्यावर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

२,८८,१२० रुपये ला फसवणूक झाल्याची माहिती

(निलेश गायकवाड)

:- यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस पोलीस चौकी येथे दि.०१ ऑक्टोबर रोजी राजेगाव तालुका दौंड येथील विजय बाळासाहेब ढमे यांच्या वरती ७०००/ किलो साखर अंदाजे रक्कम दोन लाख ८८ हजार १२० रुपये ची गायब केले चा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला आहे.
याची सविस्तर माहिती अशी की फिर्यादी नितीन काळंगे राहणार तक्रारवाडी तालुका इंदापूर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे की मी वरील ठिकाणी माझी पत्नी सौ.राणी,मुलगा यश असे कुटुंबासह रहाण्यास असून मी श्लोक ट्रेडर्स या नावाने साखर खरेदी विक्री करुन त्यावर कुंटुबाची उपजिविका चालवितो.
दिनांक. २७/०३ /२०२४ रोजीपासून मी तसेच माझे ओळखीचे विजय बाळासाहेब ढमे रा.राजेगाव,ता. दौंड,जि.पुणे याचेसोबत साखर खरेदीविक्रीचा व्यवसाय करत असून आमचे असे ठरले होते की, व्यवसायामध्ये सर्व पैसे मी गुंतवणुक करणार व खरेदी केलेला माल हा आम्ही दोघांचे संमतीने माल कोणाला दयायचा हे ठरवून तो माल पुढे विक्री करायची.मला साखर खरेदी विक्रीचे ज्ञान नसलेने मी विजय ढमे यांचेवर विश्वास ठेवला असल्याचे काळंगे यांनी सांगितले , तसेच येणारा नफा हा आम्ही दोघांमध्ये समान हिस्सा घ्यायचा असे ठरले.त्यावेळी विजय ढमे यांनी सांगितले की,पाटस कारखाना येथे अनिल जगताप हे माझे ओळखीचे आहेत ते कारखान्यात गाड्या भरण्यासाठी पावत्या (डी.ओ) देण्यासाठी असतात त्यानंतर दिनांक१२/०८/२०२५ रोजी मी विजय ढमे यांना त्यांचा मोबाईल नं. ९०९६११८५६५ यावर फोन करून सांगितले की,आज गाडी भरून भिगवणला घेवून या असे सांगितले असता विजय ढमे यांनी मला म्हणाले की,अनिल जगताप यांना फोन करून विचारतो गाडी कधी पाठवू त्यांनी सांगितले नंतर आपण गाडी भरण्यासाठी पाठवू माझे ओळखीचे पाटसचे विश्वास मधुकर भागवत यांची गाडी आहे त्यांना फोन करून सांगतो गाडी भरून भिगवणला येतील असे सांगितले. त्यानंतर दिनांक.१३/०८/२०२५ रोजी सकाळी विश्वास मधुकर भागवत रा. भागवतवाडी,पाटस ता.दौंड जि.पुणे यांचे ट्रान्सपोर्टचा टूक गाडी नं.एम.एच.1१२ एम.व्ही.७०४४ या ट्रक मध्ये ५० किलो वजनाच्या १४० साखरेच्या पिशव्या त्याचे वजन ७०००/ कीलोग्रॅम असा सदरचा वजनाचा माल कारखान्याचे अधिनियमानुसार २,८८,१२० /- रूपये किंमतीची साखर विजय ढमे यांनी ट्रकमध्ये भरली व विजय ढमे यांनी मला माझे मोबाइल नं.९९२१४४९९०० यावर फोन करून सांगितले की, एम आर एन भिमा शुगर अँन्ड पावर प्रा.लि.पाटस येथून डीओ चे काम करणारे अनिल जगताप यांनी आपली गाडी भरली असून सदरचा साखरेचा ट्रक घेवून मी भिगवणला येण्यासाठी निघालो आहे असे सांगितले परंतू विजय ढमे हा सदरचा साखर घेवून सायंकाळी ०५ वाजे पर्यंत भिगवणला आला नाही म्हणून मी विजय ढमे यांना त्यांचा मोबाईल नं. ९०९६११८५६५ यावर फोन करून गाडी भिगवणला यायला किती वेळी लागेल असे विचारले असता, त्यांनी सांगितले की,गाडी भिगवणला निघाली आहे. काही वेळात गाडी भिगवणला येईल असे बोलून फोन बंद केला.त्यानंतर सायंकाळी विजय ढमे यांना त्यांचा मोबाईल नंबरवर फोन करून विचारना केली असता, विजय ढमे यांनी मला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, तसेच विजय ढमे यांना मी गाडी वरील ड्रायव्हरचा मोबाईल नंबर मागितला असता मला सांगितले की, ड्रायव्हरचा मोबाईल नंबर माझेकडे नाही असे सांगितले त्यानंतर मी विजय ढमे यांस वारंवार त्याचे मोबाइलवर कॉल केला परंतु त्याचा मोबाइल बंद लागला त्यावेळी माझी खात्री झाली की,विजय बाळासाहेब ढमे रा.राजेगाव,ता. दौंड,जि.पुणे याने एम.आर.एन भिमा शुगर अँन्ड पॉवर प्रा.लि,पाटस येथून ५० किलो वजनाच्या १४० साखरेच्या पिशव्या त्याचे वजन ७०००/ कीलोग्रॅम असा सदरचा वजनाचा माल कारखान्याचे नियमानुसार २,८८,१२० /- रुपये किंमतीचा माल भिगवण ता.इंदापूर जि.पुणे येथे पोहोच न करता त्यामालाचा अपहार केलेला असल्याबाबत माझी खात्री झाली आहे.
असे त्यांनी त्यांच्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
तसेच ७०००/ कीलोग्रॅम वजनाचा साखरेचा माल भरलेला ट्रक हा विजय बाळासाहेब ढमे रा.राजेगाव, ता.दौंड,जि.पुणे याने मी सांगितलेल्या मौजे भिगवण ता. इंदापूर जि. पुणे या ठिकाणी न आणता सदरची साखर ही विजय ढमे याने कोठे तरी नेवून सदर मालाचा अपहार करून माझी फसवणुक केली आहे. म्हणून माझी विजय बाळासाहेब ढमे रा.राजेगाव, ता. दौंड जि.पुणे याचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे.असे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत विजय ढमे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत असे काहीच झाले नाही किव्हा मी त्यांना फसवले नाही अश्या पद्धतीने त्यांच्याकडून उत्तर मिळाले.पुढील तपास अंमलदार पो.हवालदार पानसरे करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!