मोलमजुरी करणाऱ्या महिलेचे स्वप्न स्वप्निल बंडगर यांच्या कार्यक्रमातून झाले पूर्ण; 2000 च्या पुढे रेकॉर्ड ब्रेक गर्दी महिलांची होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळाली

(निलेश गायकवाड )
निमित्त होते न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे . या कार्यक्रमांमध्ये हजारो महिलांनी सहभाग घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या होम मिनिस्टर कार्यक्रमामधून अत्यंत गरीब कुटुंबातील मोल मजुरी करून आपली उपजीविका करणाऱ्या महिलेचे स्वप्न होते की आपणाला देखील एखादी स्कुटी किंवा वाहन दैनंदिन जीवनातील खडतर प्रवासासाठी घ्यायची अशी इच्छा मनाशी बाळगून डिकसळ येथील रुक्मिणी हनुमंत भादेकर या महिलेने स्वप्निल बंडगर यांनी घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत प्रथम क्रमांक पटकावत प्रथम पारितोषिक जिंकले. या कार्यक्रमामधून एक चित्र समोर आले स्वप्निल बंडगर यांनी घेतलेल्या कार्यक्रमाचे महिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि मनमोकळ्याप्रमाणे होणारा कार्यक्रम नियोजनबद्ध केल्याबद्दल सर्व महिलांनी स्वप्निल बंडगर यांचे आभार देखील मानले.

या कार्यक्रम प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित होते. भरणे यांनी स्वप्नील चे कौतुक देखील केले. स्वप्निल ने घेत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात आपल्या माध्यमातून महिलांसाठी विशेष कार्यक्रम राबवत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन.त्याचबरोबर मदनवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अश्विनी नानासाहेब बंडगर यांच्या समवेत भिगवण परिसरातील सर्व क्षेत्रातील महिला देखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमांमध्ये प्रथम पारितोषिक १)रुक्मिणी हनुमंत भादेकर
द्वितीय २)अंकिता आकाश जावरे
तृतीय ३)निकिता सोहन दोशी 4) ज्योती महेश बागल 5) स्नेहा योगेश बाबर अशी विजेता झालेल्या महिलांची नावे. स्वप्निल बंडगर मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला भिगवन व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.