न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत ६ ऑक्टोबरला; अमळनेरकरांचेही लक्ष केंद्रीत

अपनी भाषा में पढ़े! Translate

नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत ६ ऑक्टोबरला; अमळनेरकरांचेही लक्ष केंद्रीत

 

मार्मिक न्यूज नेटवर्क: मुंबई – राज्यातील २४५ नगरपरिषद व ३१४ नगरपंचायतींसाठी नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत येत्या सोमवारी, दि. ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात सकाळी ६ वाजता ही सोडत काढण्यात येणार असून, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या सोडतीत आरक्षणाची अंतिम रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. मंत्रालयाच्या सूचनेनुसार, प्रत्येक पक्षाने दोन प्रतिनिधींची नावे शिफारस करून सोडतीसाठी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात प्रवेशावर विशेष नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

या सोडतीकडे जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींचे लक्ष लागले आहे.

अमळनेर नगरपरिषदेतही नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या वर्गासाठी निघणार, याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता आहे. नगरपरिषदेतील आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर या निकालाचा थेट परिणाम होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!