श्री मंगळग्रह मंदिरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन
अमळनेर : विक्की जाधव.
विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा गुरुवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी हा कार्यक्रम पार पडला.

अमळनेर येथील पोलिस उपअधीक्षक विनायक कोते, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. लोटन फकिरा पाटील, श्री. विलास सुकदेव चौधरी, श्री. अनिल मधुकर महाजन, श्री. सुनील सोमा महाजन, श्री. दिनेश विश्वासराव ठाकरे हे शस्त्रपूजनाचे मानकरी होते. सुरूवातीला त्यांच्या शुभहस्ते विधिवत मंत्रोच्चारात संकल्प करण्यात आला. त्यानंतर गणपती पूजन, विश्वकर्मा स्मरण, तसेच प्रधान देवता मंगळग्रह देवाचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर शस्त्रपूजन विधी पार पडला. मंदिराचे मुख्य पुरोहित शुभम वैष्णव यांनी पौरोहित्य केले. या वेळी मंगल सेवेकरी श्री. आर. टी. पाटील, श्री. प्रकाश मेखा, श्री. व्ही. व्ही. कुळकर्णी, श्री. पुषंद ढाके, मेजर राजेंद्र यादव यांच्यासह मंदिर परिसरातील उपस्थित भाविक व मंदिराचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.