राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजजागरणासाठी आज अमळनेरमध्ये होणार विजयादशमी उत्सव.
अमळनेरमध्ये संघाचा विजयानंद सोहळा मोठ्या दिमाखात होतोय साजरा..
अमळनेर : विक्की जाधव.
हिंदू समाजातील पराक्रम व शक्तीचं प्रतीक असलेला श्री विजयादशमी उत्सव यंदा शनिवारी, दि. ४ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वाजता संत सखाराम महाराज वाडी संस्थान, प्रागण येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमळनेरच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, शताब्द्याच्या उंबरठ्यावर संघकार्याच्या विस्ताराला अधोरेखित करणारा हा सोहळा ठरणार आहे.

संघकार्याच्या 100 वर्षाचा विस्तार
या विजयादशमी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्री. विक्रांतजी पाटील (M.D. मेडिसिन) तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. अनिलजी भालेराव (मा. प्रांत संघचालक, देवगिरी प्रांत) मार्गदर्शन करणार आहेत. शस्त्रपूजन, देशभक्तीपर गीतांद्वारे आणि संघशाखेच्या 100 वर्ष शिस्तबद्ध प्रात्यक्षिकातून हिंदू समाजाच्या जागृतीचा संदेश या सोहळ्यात दिला जाणार आहे.