न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

अमळनेर तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची काँग्रेसकडून मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची काँग्रेसकडून मागणी..

 

अमळनेर : विक्की जाधव.

सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे अमळनेर तालुक्यातील शेती, पिके तसेच सामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या अतिरेकामुळे रस्त्यांची दुरवस्था, घरांची पडझड, शेतपिकांचे मोठे नुकसान आणि कीटक रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झालेले आहे. अशा परिस्थितीत तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मक्याच्या भुनक्यांना दाणा भरत नाही, कपाशीवरील कैऱ्या धसत आहेत, तर सोयाबीनचे नुकसान आधीच झालेले आहे. याशिवाय कपाशीवर बोंडअळी व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्पादनात तब्बल ८० ते ९० टक्के घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नजर आनेवारी ६० टक्क्यांपेक्षा अधिक दाखवली असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी भागवत केशव सूर्यवंशी व गजेंद्र दत्तात्रय साळुंके यांनी शासनाला त्वरित आर्थिक मदत जाहीर करण्याचे, पांदण रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. शासनाने वास्तव परिस्थितीचा त्वरित आढावा घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!