माजलगावातील खासगी रुग्णालयांचे स्वच्छतेसाठी पाऊल – संजीवनी हॉस्पिटल आघाडीवर
माजलगाव/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
माजलगाव शहरातील खासगी रुग्णालये केवळ दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यातच नव्हे, तर परिसर स्वच्छ ठेवण्यातही आघाडीवर असून, शहराच्या स्वच्छतेसाठी मोठा पुढाकार घेतला आहे.
शहरातील संजीवनी हॉस्पिटल हे रुग्णांना नवसंजीवनी देणारे ठिकाण ठरत असून, केवळ उपचारच नव्हे तर वैद्यकीय कचरा व्यवस्थापन याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. हॉस्पिटल प्रशासनाने शासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.
शहरातील अनेक रुग्णालयांनी नागरिकांचे आरोग्य व स्वच्छता या दोन्ही बाबतीत सजग भूमिका घेतली आहे. मात्र, काही वेळा नगरपालिका यंत्रणेतील अडथळ्यांमुळे गैरसमज पसरतात आणि नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो.
संजीवनी हॉस्पिटलने कचरा व्यवस्थापनात आघाडी घेत, सर्वात प्रभावी व्यवस्था निर्माण केली आहे. स्वच्छ वातावरणात उपचार देण्यासाठी आवश्यक ती मनुष्यबळ व आर्थिक गुंतवणूक हॉस्पिटल करत आहे.
हॉस्पिटलचे उद्दिष्ट एकच – कोणतीही तडजोड न करता दर्जेदार आणि आधुनिक वैद्यकीय सेवा पुरवणे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, रुग्णालय प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर, कोणतेही रुग्णालय जर वैद्यकीय कचरा रस्त्यावर किंवा अवैध ठिकाणी टाकताना आढळल्यास, त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही काही जागरूक नागरिकांनी केली आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन, रुग्णालये व नागरिक यांच्यात समन्वय अत्यंत आवश्यक आहे, हे मात्र नक्की!