महिलांना गुगल जेमिनीवर ‘फोटो बनवण्याचा’ मोह; मोबाईल गॅलरीचा ॲक्सेस देणे घातक ठरू शकते

अपनी भाषा में पढ़े! Translate

महिलांना गुगल जेमिनीवर ‘फोटो बनवण्याचा’ मोह; मोबाईल गॅलरीचा ॲक्सेस देणे घातक ठरू शकते.

 

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : 

अलीकडच्या काळात गुगल जेमिनी आणि इतर AI साधनांच्या सहाय्याने फोटो तयार/संपादित करण्याचे ठराविक ‘ट्रेड’ ग्रामीण ते शहरी भागात महिलांमध्ये पसरत आहे. या प्रक्रियेत लोकांना त्यांच्या मोबाईलमधील गॅलरी किंवा उठ-सूट फोटो अॅक्सेस देण्याची मागणी केली जात आहे. सुरुवातीला सोपे वाटणारे हे  ट्रेड “फक्त एक फोटो ” किंवा “गॅलरी ऍक्सेस पर्यंत मर्यादित नाही” याचा भयंकर गैरवापर होऊ शकतो:बनावट कागदपत्रे, खोटे ओळखपत्र किंवा आर्थिक व्यवहारासाठी फोटोचा गैरफायदा यांसारखे परिणाम होऊ शकतात.

सायबरसुरक्षा तज्ञ आणि  सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे की, मोबाईल गॅलरीचा अॅक्सेस कोणालाही देण्यापूर्वी दहा वेळा विचार करा कारण एकदा फोटो बाहेर गेला की त्याचा शोध परत मिळणे कठीण होते. AI साधनांमुळे फोटोतील चेहरा, पार्श्वभूमी किंवा दस्तऐवज ही अतिशय खरीखुरी बनवता येतात; त्यामुळे स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि विशेषतः महिलांच्या ओळखीचे गैरवापर होण्याची शक्यता वाढते. लोकांना त्यांच्या डिजिटल अधिकारांची माहिती देणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्वाची आहे जागरूकता, थोडी शंका आणि तातडीने पासवर्ड/गॅलरी रीवोक केल्याने मोठा फटका टळू शकतो.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!