न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

मोबदल्यासाठी शेतकऱ्याचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष

अपनी भाषा में पढ़े! Translate

मोबदल्यासाठी शेतकऱ्याचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी कायम, प्रशासनाचे दुर्लक्

 

अमळनेर : विक्की जाधव.

अप्पर तापी प्रकल्प हतनूर अंतर्गत संपादित जमिनीचा न्याय्य मोबदला मिळावा या मागणीसाठी अनवर्दे (ता. चोपडा) येथील ७४ वर्षीय शेतकरी उमराव भाऊराव बोरसे यांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच आहे. तीन दशकांपासून मोबदल्यासाठी न्यायालयीन व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने बोरसे यांनी १० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तरीदेखील प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय किंवा प्रतिसाद मिळालेला नाही.

संपूर्ण प्रकरणात ७७ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या असून त्या जमिनींचा लाभ प्रकल्पग्रस्तांना मिळतो आहे, मात्र जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. जिल्हा भूसंपादन अधिकारी व तापी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी ठोस भूमिका घेतली नसल्याने शेतकरी व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी अनवर्दे येथील सरपंच सचिन शिरसाट, उपसरपंच महेश पवार, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी, रणजित शिंदे, सुनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनस्थळी उपस्थिती लावली. उपोषणकर्ते बोरसे यांच्या तब्येतीची परवड होत असतानाही ते उपोषणावर ठाम आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर भूमिका न घेतल्यास अनवर्दे व परिसरातील शेतकरी आक्रमक आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!