न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

पत्रकार हा लोकशाहीचा अदृश्य खांब – अरुण भाई गुजराथी

अपनी भाषा में पढ़े! Translate

पत्रकार हा लोकशाहीचा अदृश्य खांब – अरुण भाई गुजराथी.

 

अमळनेर :विक्की जाधव.

“न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यपालिका या तीन स्तंभांसोबत पत्रकारिता हा चौथा व अदृश्य स्तंभ लोकशाहीला बळकट करतो. पत्रकार हे फक्त वृत्तलेखक नसून समाजाला दिशा देणारे मार्गदर्शक आहेत,” अशा शब्दांत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांनी पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. श्री मंगळग्रह मंदिर संस्थान व व्हॉईस ऑफ मीडिया आयोजित केडर कॅम्प प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

गुजराथी म्हणाले की, “पत्रकाराकडे शब्दशक्ती कमी असली तरी देशभक्ती, मानवता आणि आचरणातील प्रामाणिकता असणे आवश्यक आहे. अहंकारापेक्षा सेवाभावाने केलेले कार्य हेच पत्रकाराचे बळ आहे.” घटना मांडताना कुठे, का, कोणी आणि कशी या चौकटीतून सत्य सादर करणे हे पत्रकारितेचे खरे कसोटीस्थान असल्याचेही त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बदलणाऱ्या पत्रकारितेबाबत त्यांनी म्हटले की, “नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज आहे, अन्यथा आपण मागे पडू.” “राजकारण, समाजकारण वा प्रशासनात त्रुटी असतील; पण नाराजी न दाखवता विधायक भाष्य करणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवणे ही खरी पत्रकारिता आहे,” असे ते पुढे म्हणाले. ‘मी’ नव्हे तर ‘आम्ही’ भावनेतून कार्य केले पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाने शासनाकडून केवळ मागण्याऐवजी देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी प्रेरणा पत्रकारांनी द्यावी, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!