न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रताप महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी विभागाचा उपक्रम : अतिथी व्याख्यान, स्टुडंट यूनिटचे उद्घाटन व पोस्टर स्पर्धा

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी विभागाचा उपक्रम : अतिथी व्याख्यान, स्टुडंट यूनिटचे उद्घाटन व पोस्टर स्पर्धा

 

अमळनेर : विक्की जाधव.

प्रताप महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी बहुआयामी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नरडाणा येथील Omsynth Life Sciences चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. युवराज सातकर यांनी “Opportunities and challenges in entrepreneurship” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. यावेळी मायक्रोबायोलॉजिस्ट्स सोसायटी, इंडिया अंतर्गत विभागात स्टुडंट यूनिट चे उद्घाटन डॉ. सातकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी भूषविले. विभागप्रमुख प्रा. शशिकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. वैशाली महाजन यांनी अतिथींचा परिचय करून दिला.

आपल्या व्याख्यानात डॉ. सातकर यांनी उद्योजकतेतील संधी व आव्हानांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना स्वतःच्या विषयाचा उपयोग करून नवीन व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहित केले. व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी डॉ. जाधव यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर विचार मांडले. कार्यक्रमास केमिस्ट्री व मायक्रोबायोलॉजी विभागातील प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात “वेदिक मायक्रोबायोलॉजी” या विषयावर पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. परीक्षक म्हणून अर्जुन बायोलॉजी क्लासच्या संचालिका सौ. सोनल जोशी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पोस्टर सादरीकरणाचे कौतुक केले. या प्रदर्शनाला माजी प्राचार्य डॉ. ए.बी. जैन, डॉ. सातकर, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. मुकेश भोळे यांसह मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. आदित्य संकलेचा, प्रा. नेहा महाजन, प्रा. भावना महाजन आदींचे योगदान लाभले. सूत्रसंचालन प्रा. हेमलता सूर्यवंशी यांनी केले तर प्रा. ममता महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!