न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

इंदापूर भाजपाचा सेवा पंधरवडा कार्यशाळा संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर भाजपाचा सेवा पंधरवडा कार्यशाळा संपन्न

( निलेश गायकवाड )

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७५ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्याचे योजिले आहे. या अनुषंगाने शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

इंदापूर विधानसभा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री प्रविण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीच्या निमित्ताने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

विकास पुरुष मोदीजी यांच्या ७५ निमित्त महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या वतीने जे कार्यक्रम घेण्याचे आयोजित केले आहे ते तब्बल पंधरा दिवस साजरे करण्यात येणार असून संपूर्ण इंदापूर तालुक्यातील गावातून मोदीजींना शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्याचे इंदापूर भाजपाच्या वतीने ठरविण्यात आल्याचे प्रतिपादन यावेळी श्री प्रविण माने यांनी केले.

रक्तदान शिबिर आयोजन, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवणे, आदरणीय मोदीजींच्या आयुष्यावर आधारित प्रदर्शनी भरवणे, आरोग्य शिबिराचे आयोजन, विचारवंत संवाद परिषद, आदरणीय मोदीजींच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचे वितरण करणे, राज्यातील विशेष व्यक्तींचा सन्मान करणे, मोदी विकास मॅरेथॉनचे आयोजन या आणि अशा असंख्य कार्यक्रमाची या पंधरवड्यात रेलचेल असल्याची माहिती माने यांनी आमच्याशी बोलताना दिली.

निमगाव केतकी येथील संत सावतामाळी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीच्या निमित्ताने प्रविण माने यांसमवेत मयुर पाटील, आकाश कांबळे,गोविंद देवकाते, धनंजय कामठे, माऊली चवरे, नानासाहेब शेंडे, गजानन वाकसे, प्रविणकुमार शहा, मनोज पवार, सदानंद शिरदाळे,राजकुमार जठार, राम आसबे, किरण गानबोटे, संतोष चव्हाण, समद सय्यद, सुजाताताई कुलकर्णी, प्रमिलाताई राखुंडे, माधुरीताई भराटे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!