शहरातील बंगालीफाईल परिसरात जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल १८ लाखांची फसवणूक पोलिसांत गुन्हा दखल.

अपनी भाषा में पढ़े! Translate

शहरातील बंगालीफाईल लां लागून असलेल्या राम वाडी परिसरात जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल १८ लाखांची फसवणूक पोलिसांत गुन्हा दखल.

 

अमळनेर : विक्की जाधव

अमळनेर शहरातील बंगालीफाईल लां लागून असलेल्या राम वाडी परिसरात जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल १८ लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोगरा देवीची शक्ती अंगात असल्याचे भासवून मंगलाबाई बापू पवार हिने कधी लग्न जमवून देईल, कधी पैसे दुप्पट करून देईल तर कधी घरामागील सोन्याच्या घागरी काढून देईल, अशा आमिषांना बळी पाडत माळी कुटुंबाकडून लाखो रुपये उकळले. सुरुवातीला लहान रकमेपासून सुरुवात करून हळूहळू लाखोंची मागणी करत तिने कुटुंबाचा विश्वास जिंकला. फेब्रुवारी ते जून या काळात तिने वेगवेगळ्या बहाण्यांनी धान्याच्या कोठीत पैसे ठेवायला लावले, टोपलीतून देवीचा मुखवटा दाखवून अडीच लाख उकळले, तर सोन्याच्या मूर्तींसाठी दीड लाख रुपये घेतले. एवढ्यावरच थांबता कामा नये असेच तिचे कारस्थान होते. घरात पाच फणी नाग आहे म्हणून धाक दाखवून पुन्हा ८० हजार रुपये मागितले. मात्र यावेळी कुटुंबातील दीपक माळीने आरशातून डोकावून पाहिले असता ती पैसे स्वतःच्या साडीत लपवत असल्याचे पाहिले आणि संपूर्ण फसवणुकीचा भांडाफोड झाला.

या प्रकरणी राजेंद्र नारायण माळी यांनी अमळनेर पोलिसात फिर्याद दाखल केली असून आरोपी मंगलाबाई बापू पवार हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ३१८(४), ३१८(२), ३१६(२) तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!