उद्योजक, अँड. प्रशांत निकम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्थरावरून शुभेच्छाचा वर्षाव

अपनी भाषा में पढ़े! Translate

उद्योजक, अँड. प्रशांत निकम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्थरावरून शुभेच्छाचा वर्षाव

अमळनेर शहरातील बांधकाम क्षेत्रात दमदार ओळख निर्माण करत, व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्यात सातत्याने झळकणारे नाव म्हणजे अँड. प्रशांत निकम. केवळ सुप्रसिद्ध बिल्डर आणि उद्योजक नव्हे, तर शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन चालणारे जनतेच्या हक्कासाठी लढणारे, समाजात मिसळून राहणारे आणि प्रत्येक समस्या स्वतःची समजून ती सोडवण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची छाप सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उमटली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी अमळनेरच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावत, निव्वळ पक्षीय कार्यकर्ते न राहता सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख निर्माण केली आहे. परिसरातील प्रत्येक लहानसहान प्रश्नात त्यांचा सहभाग आणि तत्पर मदतभाव यामुळे “हा माणूस खऱ्या अर्थाने आमचा आहे” असा विश्वास नागरिकांमध्ये दृढ होत आहे. त्यामुळेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असून भावी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहण्यास सुरुवात झाली आहे.

आगामी निवडणुकीत अँड. प्रशांत निकम हे जनतेच्या आशा-अपेक्षांचे प्रतिनिधी म्हणून समोर येतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात आहे. सामाजिक बांधिलकी, राजकीय चातुर्य आणि कार्यक्षमतेची सांगड घालून शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करणारा चेहरा म्हणून त्यांची गणना होत आहे. अमळनेरच्या विकासाचा नवा मार्ग दाखवणारा नेता – भावी नगराध्यक्ष प्रशांत निकम अशीच त्यांची ओळख आज दृढ होत आहे.

 

विक्की जाधव.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!