कर्मयोगीचं ग्रामीण भागात एक पाऊल डिजिटल साक्षरतेकडे…
कर्मयोगी फाउंडेशनकडून संगणक वाटप…
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेवर सातत्याने ग्रामीण भागात कार्यरत आहे. कर्मयोगी फाऊंडेशनची सातत्याने तळमळ आहे की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा व या शाळेत शिकणारे गरिबांची मुलं सुध्दा पुढे जावित, व या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागात गरिबांची मुलं कोठेही मांगे राहू नये यासाठी
त्यांचे संगणकीय ज्ञान वाढविण्याकरिता कर्मयोगी फाऊंडेशन व स्मार्ट डेटा एंटरप्राइजेस
इंडिया लिमिटेड मिहान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जानेवारी २०२५ बुधवारला वाकेश्वर, शिरूर,मांडवा महार, येथिल जिल्हा परिषद शाळा व
कान्होलीबारा येथील वाचनालयाला विध्यार्थी, शिक्षक व गावकरी मंडळींच्या उपस्थितीत संगणकं वाटप करण्यात आली.
यावेळी कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील दारिद्रय तेव्हाच संपेल जेव्हा या भागातील मुलं उच्च शिक्षित होऊन शासकीय सेवेत जातील किंवा व्यवसायिक होतील, त्यासाठीच कर्मयोगी फाउंडेशन तर्फे गाव तेथे वाचनालय ही संकल्पना राबविण्यात येणार आहे व या भागातील जिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या बऱ्यापैकी आहे त्या जिल्हापरिषद शाळांना संगणक वाटप करून कर्मयोगी फाउंडेशन एक पाऊल डिजिटल साक्षरतेकडे टाकण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहे.
